धुळे : टुडे पान ३ साठी...
--
फोटो क्रमांक : 29778
साक्री : राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेसाठी निवड झालेले अनन्या जाधव व पुनीत ठाकरे. शेजारी प्राचार्य, प्रशिक्षक, आदी.
--
राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेसाठी
अनन्या जाधव, पुनीत ठाकरेची निवड
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १६ : कोल्हापूर येथे १९ व २० सप्टेंबरला होणाऱ्या २० व्या ज्युनिअर राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेसाठी जिल्ह्याचा १७ वर्षांखालील मुले व मुलींचा संघ नुकताच घोषित करण्यात आला. जिल्हा रोलबॉल असोसिएशनच्या वतीने १३ सप्टेंबरला साक्री येथील प्लॅटिनम पब्लिक स्कूल येथे जिल्हास्तरीय स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते.
या निवड चाचणीत उत्कृष्ट क्रीडाकौशल्य दाखवून प्लॅटिनम पब्लिक स्कूलचे खेळाडू अनन्या जाधव व पुनीत ठाकरे यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघात आपले स्थान निश्चित केले. दोन्ही खेळाडू १९ व २० सप्टेंबरदरम्यान कोल्हापूर येथे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. प्लॅटिनम पब्लिक स्कूलच्या प्रांगणात पार पडलेल्या या निवड चाचणीत जिल्ह्यातील विविध शाळांमधील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या अनन्या जाधव व पुनीत ठाकरे यांचे मान्यवरांनी कौतुक करत त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.