धुळे टुडे २ साठी...
---
फोटो- NSK26H29775
धुळे : जय हिंद इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती सोनवणे यांना नेशन बिल्डर ॲवॉर्ड प्रदान करतांना डॉ. सुभाष बोरसे व इतर मान्यवर.
---
भारती सोनवणे यांना
नेशन बिल्डर अवॉर्ड
---
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १६ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ‘जय हिंद इंग्लिश स्कूल’च्या मुख्याध्यापिका भारती सोनवणे यांना रोटरी क्लबतर्फे ‘नेशन बिल्डर अवॉर्ड- २०२६’ या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
रोटरी क्लब धुळे क्रॉस रोड या सेवाभावी संस्थेकडून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरण अशा विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन नेशन बिल्डर ॲवॉर्ड देण्यात येतो. शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल सौ. सोनवणे यांना हा पुरस्कार मिळाला. रविवारी (ता. १३) आयोजित दिमाखदार सोहळ्यात नाशिक विभाग परीक्षा मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाष बोरसे यांच्या हस्ते सौ. सोनवणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल जयहिंद शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य तसेच जयहिंद इंग्लिश स्कूलचे चेअरमन तसेच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालकांनी मुख्याध्यापिका सौ. सोनवणे यांचे कौतुक केले.
---