धुळे टुडे २ साठी...
---
फोटो-NSK26H29780
धुळे : भारत विकास परिषदेतर्फे आयोजित भारतको जानो स्पर्धेत सहभागी विद्यार्थी- विद्यार्थीनी.
---
भारतको जानो स्पर्धा उत्साहात
---
भारत विकास परिषद धुळे शाखेतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १६ : भारत विकास परिषदेच्या धुळे शाखेतर्फे ‘भारत को जानो’ ही सामान्य ज्ञानावर आधारित आणि हिंदी, संस्कृत व प्रादेशिक भाषेच्या लोकगीतांवर आधारित राष्ट्रीय समूहगान ही धुळे शाखास्तरावरील अंतिम स्पर्धा नुकतीच धुळ्यात हॉटेल आर्कीड येथे झाली.
या स्पर्धेत धुळे शहरासह तालुक्यातील विविध २० शाळांमधील चार हजार विद्यार्थ्यांमधून अंतिम फेरीत ८० विद्यार्थी- विद्यार्थीनींचा सहभाग होता. या स्पर्धेत सहभागी संघांनी संस्कृत, हिंदी व प्रादेशिक भाषेच्या लोकगीतावर आधारित देशभक्तीपर गाणी सादर केली. या स्पर्धेतील विजेते संघ हे प्रांत स्तरावर आणि नंतर क्षेत्र स्तरावरील स्पर्धेत सहभागी होतील. दोन्ही स्पर्धांच्या धुळे शाखा स्तरावरील अंतीम फेरीच्या उद्घाटन कार्यक्रमाला रा. स्व. संघाचे विभाग कार्यवाह राजेश पाटील अध्यक्षस्थानी होते. ‘भाजप बेटी बचाव- बेटी पढाव’च्या अल्पा अग्रवाल उद्घाटक होत्या. संघटनेचे महाराष्ट्र उत्तर प्रांत महासचिव राजेंद्र जाखडी महाराष्ट्र उत्तर प्रांत संघटन सचिव राजेश वाणी प्रमुख अतिथी होते. प्रकल्पप्रमुख अनिल वाणी यांनी स्पर्धेची नियमावली सांगितली. पारितोषिक वितरण कार्यक्रमाला शहर संघचालक संजय देसले अध्यक्षस्थानी होते. डॉ. के. म. दुग्गल स्मृती समितीचे अध्यक्ष श्रीराम देशपांडे प्रमुख मार्गदर्शक होते. उत्तर महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष विशाल चोरडिया, महासचिव जाखडी, भारत विकास परिषद अध्यक्ष विजयसिंह सिसोदीया, सचिव विनित जैन, कोशाध्यक्ष राजू बडगुजर, संस्कार समन्वयक अमित गोराणे, प्रकल्पप्रमुख वाणी, सहप्रकल्प प्रमुख संगीता उपासनी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. माधवी तेले, पौर्णिमा कोतकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिव जैन, संस्कार समन्वयक अमित गोराणे यांनी आभार व्यक्त केले.