अभियंत्यांच्या तांत्रिक कौशल्याचा गौरव

अभियंत्यांच्या तांत्रिक कौशल्याचा गौरव
Published on
ॲंकर NSK26H29779 जळगाव : ‘महावितरण’च्या परिमंडल कार्यालयात आयोजित अभियंता दिन सोहळ्यात अभियंत्यांचा सन्मान करताना मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी. सोबत अधीक्षक अभियंता मदन सांगळे, निवृत्त मुख्य अभियंता व्ही. डी. पाटील. ........ अभियंत्यांच्या तांत्रिक कौशल्याचा गौरव ‘महावितरण’तर्फे अभियंता दिन उत्साहात; ग्राहकसेवा सक्षम करण्याचे आवाहन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध आव्हानांचा सामना करीत अहोरात्र सेवा देणाऱ्या महावितरणच्या अभियंत्यांचा राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त गौरव करण्यात आला. भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीचे औचित्य साधून जळगाव परिमंडलात मंगळवारी अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी होते. सेवानिवृत्त मुख्य अभियंता (जलसिंचन) व्ही. डी. पाटील आणि जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता मदन सांगळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे अभियंत्यांशी संवाद साधला. आणीबाणीच्या परिस्थितीतही अभियंते सातत्याने कार्यरत राहतात, याबद्दल त्यांनी कौतुक केले. वीज सुरक्षा, हरित ऊर्जा आणि वीज बचतीबाबत शाळा-महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या जनजागृती उपक्रमांचेही त्यांनी विशेष कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात मुलाणी यांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून त्याचा वापर ग्राहकसेवा अधिक सक्षम करण्यासाठी करण्याचे आवाहन केले. महावितरणच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी अभियंत्यांनी जबाबदारीने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान, अभियंत्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी कार्यक्रमात ‘ताणतणाव व्यवस्थापन’ विषयावर विशेष सत्र घेण्यात आले. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या संचिती सदुरकर यांनी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास परिमंडलातील कार्यकारी अभियंते आणि मोठ्या संख्येने अभियंते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com