शिवाजी भोये मागणी

शिवाजी भोये मागणी
Published on
धुळे : टुडे पान ४ साठी... -- नंदुरबार- कुडाशी मार्गाला राज्य महामार्गाचा दर्जा द्या -- शिवाजी भोये यांची खासदारांसह आमदारांकडे मागणी सकाळ वृत्तसेवा वार्सा, ता. १६ : नंदुरबार, धुळे आणि नाशिक या तीन जिल्ह्यांना जोडणाऱ्या नंदुरबार- ठाणेपाडा- छडवेल- ब्राह्मणवेल- कोंडाईबारी- रोहोड-कुडाशी- चिवटीबारी- आलियाबाद- कळवण या रस्त्याला राज्य महामार्गाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती शिवाजी आर. भोये यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲड. गोवाल पाडवी आणि विधानपरिषद आमदार अमरीशभाई पटेल यांना निवेदन दिले आहे. - हा मार्ग मोठ्या प्रमाणात आदिवासी भागातून जातो. सध्या या रस्त्यावरून वाहतूक आणि रहदारीचे प्रमाण खूप वाढले आहे. तीन जिल्ह्यांमधील दळणवळणासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु, या रस्त्याला राज्य महामार्गाचा दर्जा नसल्यामुळे त्याच्या रुंदीकरणाला आणि विकासाला मर्यादा येत आहेत. हा रस्ता राज्य महामार्ग झाल्यास रस्त्याची सुधारणा होईल आणि आदिवासी भागातील दळणवळणाला गती मिळेल. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम आणि महामार्ग विभागाकडून या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती श्री. भोये यांनी केली आहे. अमरीशभाई पटेल हे धुळे- नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषद सदस्य असल्याने त्यांनी देखील यात लक्ष द्यावे यासाठी खासदार पाडवी यांच्यासह आमदार पटेल यांच्याकडे मागणी केल्याचे श्री. भोये यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com