ज्येष्ठा गौराई आगमन

ज्येष्ठा गौराई आगमन
Published on
धुळे : टुडे पान १ साठी... अँकर -- फोटो क्रमांक : 29784, 29785 धुळे : ज्येष्ठा गौराईच्या आगमनानिमित्त शहरातील बाजारपेठेत साडी- चोळी, नथ, मंगळसूत्र आणि पारंपरिक दागिन्यांनी पूर्ण सजवून विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आकर्षक गौरींच्या मूर्ती. तर दुसऱ्या छायाचित्रात बाजारपेठेत दाखल झालेले सुबक मुखवटे, साचे पाहताना महिला. (छायाचित्रे : गोरख गर्दे) -- गौराईच्या आगमनासाठी जिल्ह्यातील बाजारपेठा सज्ज -- सजावटीचे साहित्य, मुखवटे अन्‌ दागिन्यांच्या खरेदीसाठी महिलांची गर्दी -- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १६ : गणेशोत्सवाच्या उत्साहातच आता जिल्ह्यात ज्येष्ठा गौराईच्या आगमनाची चाहूल लागली आहे. गौरी पूजनासाठी आवश्यक असलेले आकर्षक मुखवटे, साचे, हात, पारंपरिक दागिने आणि विविध सजावटीचे साहित्य धुळ्यातील बाजारपेठेत दाखल झाले असून, खरेदीसाठी महिलांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. विविध रंग, आकार आणि सुबक नक्षीकाम असलेले मुखवटे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. - महाराष्ट्रात घराघरांत कुलाचार व परंपरेनुसार गौरी-महालक्ष्मी पूजनाची पद्धत वेगवेगळी आहे. काही घरांत धान्याच्या राशीवर, मडक्यांच्या उतरंडीवर किंवा कोथळ्यांवर गौरींची स्थापना केली जाते. जिल्ह्यात उभ्या गौरींच्या मांडणीची परंपरा मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात गौरीच्या मुखवट्यांसोबत हातांची जोडी, साडी- चोळी, दागिने, हार, मुकुट आणि पूजास्थळाच्या आराशीसाठी लागणारे साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे. यंदा बाजारात चार मुखवटे आणि हातांचा संच एक हजार ते दोन हजार ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. गौरीच्या मांडणीसाठी लागणाऱ्या साच्यांची किंमत एक हजार ते एक हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. महिला आपल्या घरातील परंपरा, मांडणीची पद्धत आणि बजेटनुसार साहित्याची खरेदी करत आहेत. - प्रतिकृतींना मागणी ज्येष्ठा गौरीच्या पूजेत विशेष महत्त्व असलेल्या भाजीपाला व फळांच्या प्रतिकृतींनाही मोठी मागणी आहे. कारले, काकडी, केळी, आंबे, विविध फळे यांच्या रंगीबेरंगी प्रतिकृती सुंदर ट्रेमध्ये सजवून विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय मूर्तींची ने- आण व मांडणीसाठी विविध प्रकारचे स्टँड तसेच आधुनिक सजावटीचे साहित्य दुकानांमध्ये सजले आहे. गौरी पूजनाच्या काळात मुखवट्यांचे आवाहन करून त्यांना घरात आणणे, साडी-दागिन्यांनी सजविणे आणि नैवेद्य दाखविण्याची परंपरा असल्याने धार्मिक व सजावटीच्या वस्तूंची विक्री वाढली आहे. गौराईच्या आगमनामुळे गणेशोत्सवातील उत्साहाला अधिकच रंगत आली असून, बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने गजबजून गेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com