धुळे टुडे १ संक्षीप्त

धुळे टुडे १ संक्षीप्त
Published on
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त -- घरफोडीत पिस्तुलसह रोकड-दागिने लंपास धुळे : नेर (ता. धुळे) येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी परवानाधारक पिस्तूल, दोन मॅगझीन, दहा जिवंत काडतुसे, रोकड व सोन्याचे दागिने, असा एकूण ६० हजारांचा मुद्देमाल नेला. याबाबत अनिल आनंदा सूर्यवंशी (रा. म्हसदी फाटा, मुनदेवीनगर) यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सूर्यवंशी कामानिमित्त १९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबरदरम्यान घराबाहेर असताना चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. कपाटाचे लॉकर फोडून ३० हजारांचे ३२ एनपी बोअरचे परवानाधारक पिस्तूल, दोन मॅगझीन व दहा जिवंत काडतुसे, २० हजारांची रोकड तसेच दहा हजारांची सोन्याची अंगठी व कानातील बाळ्या असा मुद्देमाल लंपास केला. -- कुंडाणेत घरफोडी; किमती ऐवज लंपास धुळे : कुंडाणे (ता. धुळे) येथील निवृत्त प्राचार्य मारोती पांडुरंग जांभळे यांच्या घरात ८ सप्टेंबरला चोरी झाली. चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून १५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, चार तोळे सोन्याच्या बांगड्या, पाच ग्रॅम सोन्याचे कानातील दागिने, चांदीचे शिक्के व ३५ हजारांची रोकड, असा ६६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल नेला. जांभळे यांच्या फिर्यादीनुसार धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. -- कुळथे शिवारात ४० हजारांची चोरी धुळे : कुळथे (ता. धुळे) शिवारातील शेतातील वीज पोलवर बसविलेल्या व्होल्टेज कॅपेसिटरमधील तांब्याच्या तारा व लोखंडी साहित्य, असा सुमारे ४० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ही घटना ११ ते १२ सप्टेंबरदरम्यान रात्री घडली. कुळथे शिवारातील गट क्रमांक दोनशेमधील सतीश महाले यांच्या शेतातील वीज पोलवर व्होल्टेज कॅपेसिटर बसविण्यात आले होते. चोरट्यांनी पोलवरील सुरक्षेचे लोखंडी जाळे तोडून कॅपेसिटरमधील तांब्याच्या तारा व लोखंडी साहित्य काढून नेले. महावितरण कंपनीचे तंत्रज्ञ संतोष वसंतराव बागूल (रा. लळिंग, ता. धुळे) यांच्या फिर्यादीनुसार धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. -- विहिरीत पडून महिलेचा मृत्यू धुळे : वडजाई (ता. धुळे) शिवारात पाणी काढताना पाय घसरून विहिरीत पडल्याने तरुण महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. इंदूबाई पिंटू हाके (वय २०, रा. अन्वरनाला परिसर, धुळे) असे मृत महिलेचे नाव आहे. बारा सप्टेंबरला सकाळी साडेनऊच्या सुमारास त्या विहिरीतून पाणी काढत असताना पाय घसरून विहिरीत पडल्या. नागरिकांच्या मदतीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com