''आयुष''च्‍या प्रवेश नोंदणीची उद्यापर्यंत संधी

''आयुष''च्‍या प्रवेश नोंदणीची उद्यापर्यंत संधी
Published on
‘आयुष’च्‍या प्रवेश नोंदणीची उद्यापर्यंत संधी आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानीसह इतर शिक्षणक्रमाचा समावेश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : राज्‍यस्‍तरावर सध्या सुरू असलेल्‍या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश प्रक्रियेंतर्गत महत्त्वाचा टप्पा असलेल्‍या आयुष अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशनोंदणीला सुरुवात झाली आहे. पात्रताधारक विद्यार्थ्यांना शुक्रवार (ता. १८)पर्यंत नोंदणी करता येईल. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी वैद्यकीय शिक्षणांतर्गत आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस), युनानी (बीयूएमएस) यांसह फिजिओथेरपी (बीपीटी), बीओटी, बीएएसएलपी, बीपी अँड ओ व बीएनवायएस या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस सुरुवात झाली आहे. नोंदणीची अंतिम तारीख शुक्रवार (ता. १८)पर्यंत आहे. पहिली गुणवत्तायादी २७ सप्टेंबरला जाहीर केली जाईल. २०२६ मध्ये नीट परीक्षेतून पात्र झालेल्या विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेशासाठी नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे. इन्‍फो विद्यार्थ्यांसाठी अशा आहेत सूचना विद्यार्थ्यांनी पोर्टलवर सर्व मूळ आवश्यक कागदपत्रांची रंगीत स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी. तसेच कागदपत्र पडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी सर्व मूळ कागदपत्रांसह पडताळणी केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी वैद्यकीय मंडळाने जारी केलेले दिव्यांग पात्रता प्रमाणपत्र सादर करावे. ईडब्ल्यूएसचा दावा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी वैध ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र सादर करावे. आरक्षण प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक आहे. इन्‍फोः असे आहे पहिल्‍या फेरीचे वेळापत्रक - नोंदणीद्वारे प्रवेश प्रक्रियेत सहभाग - १८ सप्टेंबर, सायं. ५ पर्यंत - कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत - १८ सप्‍टेंबर, रात्री १० पर्यंत - ऑनलाइन/छाननी केंद्राद्वारे दस्‍तऐवज पडताळणी - १९ सप्‍टेंबरपर्यंत - नोंदणीकृत उमेदवारांच्या यादीची प्रसिद्धी - २० सप्टेंबर - अंतिम गुणवत्तायादीची प्रसिद्धी - २४ सप्टेंबर - ऑनलाइन पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया - २४ ते २६ सप्टेंबर - पहिल्या वाटप यादीची प्रसिद्धी - २७ सप्टेंबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com