गणेशघाटावर सुविधा पुरविण्याबाबत सूचना

गणेशघाटावर सुविधा पुरविण्याबाबत सूचना
Published on
NSK26H29802 जळगाव : गणेश विसर्जनाच्या पार्श्र्वभूमीवर मेहरुण तलावावरील गणेशघाटाची पाहणी करताना महापौर दीपमाला काळे. सोबत शहर अभियंता योगेश बोरोले व अन्य अधिकारी. ---- गणेशघाटावर आवश्‍यक सुविधा पुरवा उपशीर्षक महापौरांच्या सूचना : विसर्जनाच्या पार्श्र्वभूमीवर तलाव परिसराची पाहणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : महापौर दीपमाला काळे यांनी मेहरूण तलावातील गणेश घाटाची पाहणी करून श्री गणेश विसर्जन पूर्वतयारीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या वेळी शहर अभियंता योगेश बोरोले, आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले, विद्युत विभाग प्रमुख संदीप मोरे यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या केल्या सूचना पाहणीदरम्यान महापौरांनी गणेश विसर्जन सोहळा स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आरोग्य विभागाला सविस्तर नियोजन करण्याचे निर्देश दिले. गणेश घाटावर भाविकांची सोय व्हावी, यासाठी निर्माल्य कलशांची संख्या पुरेशी वाढविण्यात यावी. नागरिक व गणेश मंडळांनी निर्माल्य कोणत्याही प्लास्टिक पिशवीत न आणता कागदात गुंडाळून किंवा कागडी पिशवीत आणून थेट निर्माल्य कलशातच टाकावे. घरून निघताना कोणीही प्लास्टिक पिशवी सोबत आणू नये, अशा विविध सूचना महापौरांनी दिल्या आहेत. विसर्जनादरम्यान जळगावकरांनी परिसर स्वच्छ ठेवावा. विसर्जनस्थळी अनावश्यक गर्दी न करता सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्रक्रिया पार पाडावी. विसर्जन व्यवस्थेसाठी उपलब्ध असलेले तराफे, तैनात कर्मचाऱ्यांची संख्या तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांची महापौरांनी माहिती घेतली. विसर्जन काळात कार्यरत राहणाऱ्या महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरवायच्या भोजन व्यवस्थेचाही त्यांनी आढावा घेतला. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com