धुळे : टुडे पान १ साठी...
--
फोटो क्रमांक : 29804
धुळे : सेवा सप्ताहाअंतर्गत मुंबईतील किम्स हॉस्पिटलमध्ये मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी रवाना होणाऱ्या बालकांसह पालक, एबी फाउंडेशनचे अध्यक्ष कमलेश देवरे व आरबीएसके पथक.
--
मोफत शस्त्रक्रियेसाठी बालके मुंबईकडे रवाना
--
दहा चिमुकल्यांना मिळणार जीवनदान; सेवा सप्ताहात तपासणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १६ : आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या सेवा सप्ताह अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालय आणि एबी फाउंडेशनतर्फे लहान बालकांसाठी हृदय तपासणी क्लिनिक सुरू करण्यात आले. याअंतर्गत २०० बालकांची तपासणी झाली. त्यातील १० चिमुकल्यांची मुंबईतील किम्स हॉस्पिटलमध्ये मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी निवड झाली असून, बुधवारी (ता. १६) त्यांना उपचारासाठी रवाना करण्यात आले.
-
चिमुकल्यांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावर उपचाराची चिंता असली तरी आपल्या पाल्याला निरोगी आयुष्य मिळणार ही आशा त्यांच्या मनात आहे. उपचारासाठी मुंबईला जाणाऱ्या या बालकांचा आणि पालकांचा प्रवास, राहण्याची व्यवस्था, भोजन व उपचाराचा संपूर्ण खर्च मोफत करण्यात आला आहे. आर्थिक अडचणींमुळे उपचारापासून वंचित राहणाऱ्या कुटुंबांसाठी हा उपक्रम खऱ्या अर्थाने मोठा आधार ठरला आहे. या सप्ताहाचा भाग म्हणून जिल्हा रुग्णालय, एबी फाउंडेशन आणि किम्स हॉस्पिटलतर्फे रुग्णालयाच्या कॅथलॅबमध्ये बालकांसाठी स्वतंत्र कक्षाचे लोकार्पण झाले आहे. याचा लाभ धुळ्यासह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा आणि चाळीसगाव परिसरातील ० ते १८ वयोगटातील गरजू बालकांना मिळणार आहे. किम्स हॉस्पिटलचे डॉ. श्रीनिवास व त्यांची टीम, एबी फाउंडेशनचे अध्यक्ष कमलेश देवरे आणि आरबीएसकेच्या टीमने बालकांची तपासणी व उपचाराची प्रक्रिया राबवली. या उपक्रमासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे यांचे सहकार्य झाले.