आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
Published on
शहर टुडे पानासाठी NSK26H29813 जळगाव : आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर अनुदान लाभार्थ्यांना वाटपप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी करिश्‍मा नायर. –––– आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर अनुदान योजनेअंतर्गत २०२६-२७ या वर्षातथ प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर कार्यवाही सुरू आहे. या योजनेंतर्गत समाज कल्याण विभागास एकूण २०८ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यावर्षी उपलब्ध तरतुदीनुसार ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामधून ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या समाज कल्‍याण विभागामार्फत आंतरजातीय विवाह प्रोत्‍साहनपर अनुदान योजना राबविली जाते. यात दरवर्षी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्‍यास अनुदान दिले जात असते. त्‍यानुसार २०२६-२७ या वर्षासाठी प्राप्‍त प्रस्‍तावांसाठी तरतुदीनुसार अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. यात कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात मुख्य कार्यकारी अधिकार करिश्मा नायर यांच्या हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले. यावेळी संबंधित लाभर्थ्यांना करिश्मा नायर यांनी भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रभारी समाजकल्याण अधिकारी भाऊसाहेब अकलाडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com