(कृपया बातमी अवश्य घ्यावी)
फोटो : NSK26H29817
नंदुरबार : बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करताना प्राचार्य आर. आर. पाटील. शेजारी शोभराज खोंडे, प्रितेश पाटील, संतोष मराठे.
----------
आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन
स्व. डॉ. दिलीपराव मोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजन
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १७ : स्व. डॉ. दिलीपराव मोरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सेंट मदर टेरेसा शाळेत आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा झाली. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष कुंदन पाटील व जिजामाता एज्युकेशन सोसायटीचे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य आर. आर. पाटील यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. या वेळी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्पर्धेत १४ शाळांचे एकूण २५२ विद्यार्थी सहभागी झाले. यापैकी सतरा वर्षाखालील एकूण १३० विद्यार्थी व अकरा वर्षाखालील एकूण १२२ विद्यार्थी सहभागी झाले. संस्थेचे सचिव डॉ. अभिजित मोरे यांच्या कल्पनेतून ही स्पर्धा आयोजित केली जाते. शोभराज खोंडे यांच्या सहकार्यातून स्पर्धा झाली. स्पर्धेचे नियोजन प्रितेश पाटील व संतोष मराठे यांनी केले. पूजा मंदाना व रुबीना सय्यद यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. प्राचार्या तेजस्वीता वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा उत्साहात झाली. जिजामाता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शोभा मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेसाठी आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली. प्रथम विजेत्यास पाच हजार रूपये, द्वितीय विजेत्यास चार हजार रूपये, तृतीय विजेत्यासाठी तीन हजार रूपये, उत्तेजनार्थ बक्षीस एक हजार रूपये रोख देण्यात आले. सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली. अकरा वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम देवांशू भामरे (एस. ए. मिशन), द्वितीय काला लक्ष (एस. ए. मिशन), तृतीय श्रुत जैन (पोद्दार स्कूल), उत्तेजनार्थ बक्षीस गोगीया प्रेम (सेंट मदर टेरेसा) यांनी मिळविले. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक भावेश मराठे (एस. ए. मिशन), द्वितीय प्रहर्ष पाटील (एस. ए. मिशन), तृतीय कृष्णा पाटील (के. आर. पब्लिक स्कूल), उत्तेजनार्थ बक्षीस आरव गोसावी (चावरा स्कूल) याने मिळवले.