ॲंकर (आवश्यक)
---
NSK26H29815
पाळधी : बगीच्यासह ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील.
---
पाळधीत साकारणार बगीच्यासह ‘ऑक्सिजन पार्क’
पालकमंत्री पाटील : उत्सवाच्या खर्चातून हिरवाई; ‘जीपीएस’चा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
पाळधी, ता. १६ : गणपती व नवरात्रोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून त्याच निधीतून गावासाठी सुंदर बगीचा उभारण्याचा जीपीएस मित्र परिवाराचा निर्णय हा सामाजिक भान जपणारा आणि इतरांसाठी अनुकरणीय उपक्रम आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
पाळधी खुर्द येथे बहिणाबाई मार्टजवळ, स्मशानभूमीच्या पुढील परिसरात उभारण्यात येणाऱ्या आकर्षक बगीच्याचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्साहात झाले.
पालकमंत्र्यांच्या सूचनेतून व युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या संकल्पना व प्रयत्नातून जीपीएस मित्र परिवाराने हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रताप पाटील यांनी बगीच्याची रचना, प्रस्तावित ऑक्सिजन पार्क, नागरिकांना होणारा उपयोग आणि भविष्यातील देखभाल याबाबत सविस्तर माहिती दिली.
यांची होती उपस्थिती
या भूमिपूजन सोहळ्यास उद्योजक शरद कासट, सुनील झंवर,सिद्धिविनायक महागणपतीचे अध्यक्ष श्रीकांत मणियार, माजी सभापती मुकुंद नन्नवरे, पाळधी बुद्रुकचे सरपंच विजू बापू, पाळधी खुर्दचे सरपंच शरद कोळी, माजी उपसभापती दिनकर पाटील, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष दिलीप पाटील, उद्योजक दिलीप पाटील आदी उपस्थित होते. भूषण माळी यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत झंवर यांनी आभार मानले.