डॉ.राजेंद्र सिंहडॉ.राजेंद्र सिंह

डॉ.राजेंद्र सिंहडॉ.राजेंद्र सिंह
Published on
NSK26H29819 जळगाव : ‘चला जाणूया नदीला’बाबत बैठकीत सूचना देताना डॉ. राजेंद्र सिंह. शेजारी जिल्हाधिकारी रोहन घुगे आदी. --- राज्याच्या विकासात पाणी नियोजन कळीचा मुद्दा डॉ. राजेंद्र सिंह : गिरणा नदी खोरे पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती देण्यावर चर्चा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : राज्याच्या विकासात पाण्याचे नियोजन व कार्यक्षम वापर हा कळीचा मुद्दा असून, जलसंकटावर मात करण्यासाठी लोकसहभाग आणि जलसाक्षरता काळाची गरज आहे. राज्य शासनाच्या जलसाक्षरता व नदी संवर्धन उपक्रमाचे दूरगामी परिणाम दिसत आहेत. सर्वसामान्यांमध्ये जलविषयक जनजागृती झाल्याशिवाय जलसमस्या सुटणार नाही, असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले. गिरणा नदी खोरे पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या पुढील वाटचालीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘चला जाणूया नदीला’ यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी रोहन घुगे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, उपवन संरक्षक सौरिश सहाय, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंजूषा घाटगे, राज्यस्तरीय समितीचे अशासकीय सदस्य नरेंद्र चौघ, गिरणा, भोनक, डोंगरी, तितूर, बेलगंगा, भराडी या नद्यांचे समन्यवयक विशाल सोनकुळ, सोगर धनाड, प्रणील चौधरी, तेजस पाटील, सविता राजपूत, शेखर निंबाळकर, प्रशांत गायकवाड, राजेंद्रसिंह पाटील, किरण पाटील, एकनाथ मातळकर, मिलिंद देवकर व अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com