फोटो : NSK26H29825
नंदुरबार : प्राचार्य महेंद्र रघुवंशी यांना पुरस्कार प्रदान करताना विघ्नेश कुलकर्णी, फत्तेचंद रांका, डॉ. सुधाकर जाधवर, ॲड. शार्दूलराव जाधवर, सुरेखा जाधवर.
-------------------
प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी
आदर्श पुरस्काराने सन्मानित
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १७ : येथील जीटीपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी यांचा राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुणे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यिूटतर्फे हा पुरस्कार पुणे येथे झालेल्या सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
पुणे येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुलात जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टट्यिूटतर्फे आदर्श पुरस्कार वितरण सोहळा झाला. यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विघ्नेश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास रांका ज्वेलर्सचे अध्यक्ष फत्तेचंद रांका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दूलराव जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होते.
या सोहळ्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, मराठवाडा मित्र मंडळाच्या डेक्कन जिमखानाचे अध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. पराग सदगीर यांचाही गौरव करण्यात आला. पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी यांनी महाविद्यालयातील गुणवत्ता वाढीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन आमदार चंद्रकांत रघुवंशी, व्हा. चेअरमन मनोज रघुवंशी, संचालक मंडळ, अधीक्षक पुष्पेंद्र रघुवंशी आदींनी त्यांचे कौतुक केले.