NSK26H29847
नंदुरबार : ‘फोर्टचा राजा’ गणेशमूर्तीची प्रतिकृती साकारणाऱ्या कलाकारांचा सत्कार करताना डॉ. हीना गावित. शेजारी रणजितसिंग राजपूत, लक्ष्मण माळी, संजीव पाटील.
---
रांगोळीतून गणेशमूर्तीची प्रतिकृती
साकारणाऱ्या कलाकारांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २१ : शहरातील गणपती मंदिरात गणेशोत्सवानिमित्त ‘फोर्टचा राजा’ गणेशमूर्तीची प्रतिकृती रांगोळीद्वारे साकारणारे गौरव माळी व त्यांच्या सहकारी यांच्या रांगोळी प्रदर्शनाचा प्रारंभ माजी खासदार डॉ. हीना गावित यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी डॉ. गावित यांच्याहस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
गणेशोत्सवानिमित्त रांगोळी कलाकार गौरव माळी व त्यांचे सहकारी यांनी मुंबई येथील प्रसिद्ध ‘फोर्टचा राजा’ गणपतीची प्रतिकृती रांगोळीतून साकारली आहे. नंदुरबार येथील गणपती मंदिरात ही प्रतिकृती साकारण्यासाठी ४८ तसांचा कालावधी लागला. यासाठी दहा किलो रंगाचा वापर करण्यात आला. या वेळी राज्य कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजितसिंग राजपूत, मंदिराचे पुजारी प्रदीप भट, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी, माजी नगरसेविका माधुरी श्रॉफ, मोहन श्रॉफ, संजीव पाटील, अमोल भट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी प्रारंभप्रसंगी डॉ. हिना गावित यांच्याहस्ते गणपतीची आरती करण्यात आली. तसेच त्यांना गणपतीची प्रतिमा भेट देण्यात आली. कलाकारांनी यापूर्वी मानाचा दादा गणपती, लालबागचा राजा, माळीवाड्याच्या राजा यांसह विविध प्रकारच्या प्रतिमा रांगोळीतून रेखाटल्या आहेत. महादू हिरणवाळे यांनी सूत्रसंचालन केले.