NSK26H29849
निफाड : लोकशाही दिनानिमित्त झालेल्या स्पर्धेतील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांसमवेत प्राचार्य डॉ. विनायक काळे. शेजारी उपप्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, प्रा. डॉ. सुसान लॉरेन्सिया, प्रा. ज्ञानेश्वर मोगल, प्रा. सारिका दौंड, प्रा. गोकुळ सानप, प्रा. चित्रा कापसे आदी.
-------
३०-२
लोकशाही नागरिकांच्या
विकासाचा जीवनमार्ग
प्राचार्य डॉ. काळे ः निफाड महाविद्यालयात कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
निफाड, ता. १७ : लोकशाही ही केवळ एक शासनपद्धती नसून ती नागरिकांच्या विकासाचा जीवनमार्ग होय. व्यक्ती- व्यक्तीमधील आणि देशादेशातील प्रश्न शांततामय मार्गाने सोडविण्याचा लोकशाही हाच एकमेव मार्ग होय. म्हणून जगभरात लोकशाही हा शासन प्रकार बहुतांश देशांनी स्वीकारला आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विनायक काळे यांनी केले.
मविप्र समाज संस्थेच्या येथील कर्मवीर गणपत दादा मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागातर्फे मंगळवारी (ता.१५) जागतिक लोकशाही दिननिमित्त झालेल्या निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, प्रा. डॉ. सुसान लॉरेन्सिया, प्रा. ज्ञानेश्वर मोगल, प्रा. सारिका दौंड, प्रा. गोकुळ सानप, प्रा. चित्रा कापसे आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी प्रास्ताविकातून लोकशाही शासन पद्धतीचा विकास सांगून लोकशाहीपुढील आव्हाने आणि सोडविण्याचे मार्ग विशद केले.
निबंध लेखन स्पर्धेत स्पर्धेत पन्नास विद्यार्थ्यांनी भाग घेतला. रुपाली पवार, नम्रता डावरे, पंढरीनाथ पाचगे, प्रिया मौर्या, गायत्री पानसरे, वर्षा निरभवणे, दिव्या साबळे, दिव्या वाघ, रोहित घेगडमल यांनी यश संपादन केले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. प्रा. मोगल यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. लॉरेन्सिया यांनी आभार मानले.
------