गोदावरी अभियांत्रिकीत ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’

गोदावरी अभियांत्रिकीत ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’
Published on
गोदावरी अभियांत्रिकीत ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण विचार,समस्या सोडविण्याची क्षमता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि उद्योजकतेची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंटरनल हॅकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्‌घाटन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रमुख परीक्षक व युवा उद्योजक अजिंक्य तोतला, तसेच अधिष्ठाता व विभागप्रमुखांच्या उपस्थितीत झाले. प्रारंभी महाविद्यालयीन समन्वयक डॉ. अतुल बऱ्हाटे यांनी स्मार्ट इंडिया हॅकाथॉनची संकल्पना, स्पर्धेचे स्वरूप आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या विविध संघांनी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या विभागांमध्ये दिलेल्या समस्यांवर आधारित नावीन्यपूर्ण कल्पना व तंत्रज्ञानाधारित उपाय सादर केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पनांचे प्रभावी सादरीकरण केले.स्पर्धेचे परीक्षण अजिंक्य तोतला यांनी केले. अंतर्गत परीक्षणासाठी डॉ. नीलेश चौधरी, डॉ. सचिन महेश्री आणि डॉ. किशोर महाजन यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. ----- चौकट स्पर्धेतील विजेते संघ प्रथम अल्गोनिक्स संघ, द्वितीय डिजिटल टायटन्स संघ, तृतीय ॲग्निटर्स एक्स संघ. रिद्धी भिरुड, मोईश नारखेडे, प्रतीक वारके आणि डिंकी शदानी यांनी केले. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com