गोदावरी अभियांत्रिकीत
अभियंतादिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १७ : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त येथील गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्किी महाविद्यालयात अभियंता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मंगळवारी (ता.१५) उत्साहात साजरा करण्यात आला. उद् घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धम्मपाल एच. पंडित, पवन शिंपी व अमोल पारेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. पाटील यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात अभियंत्यांनी केवळ तांत्रिक ज्ञानावर अवलंबून न राहता सर्जनशील विचार, आत्मविश्वास व समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करावी, असे आवाहन केले. दरम्यान, महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स विभागातही अभियंतादिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व रंजक क्विझ स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास प्रा. डॉ. एच. टी. इंगळे, प्रा. डॉ. आय. एस. जाधव, प्रा. डॉ. व्ही. डी. चौधरी, प्रा. डॉ. देवेंद्र मराठे, प्रा. एम. एन. पाटील व प्रा. हेमराज धांडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. तुषार कोळी, डॉ. नितीन भोळे, डॉ. हेमंत इंगळे, प्रा. नीलेश वाणी, प्रा. महेश एच. पाटील व डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा यांनी सहकार्य केले. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक केले.