धुळे टुडे २ साठी...
---
फोटो- NSK26H29851
धुळे : रिअल इंडो ग्लोबल व्हीजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशनतर्फे प्रकाश पाठक यांचा सपत्नीक जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करतांना प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, डॉ. प्रवीणसिंग गिरासे, प्रा. डॉ. संभाजी पाटील.
---
प्रकाश पाठक यांना
जीवन गौरव पुरस्कार
---
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १७ : प्रदीर्घ काळातील उल्लेखनीय शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक योगदानाबद्दल रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन धुळे यांच्या वतीने सनदी लेखापाल प्रकाश पाठक यांना ‘सरदार वल्लभभाई पटेल जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ ने गौरविण्यात आले.
श्री. पाठक यांनी सनदी लेखापाल म्हणून लेखापरीक्षण, करसल्ला, शैक्षणिक संस्था, धर्मादाय संस्था तसेच समाजहिताच्या विविध क्षेत्रांत प्रदीर्घ काळ निष्ठेने कार्य केले आहे. त्यांच्या व्यावसायिक प्रामाणिकतेसोबतच सामाजिक बांधिलकी आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे फाउंडेशनने म्हटले आहे. सरदार वल्लभभाई पटेल कार्य गौरव पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. प्रवीणसिंग गिरासे, रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. संभाजी पाटील यांच्या उपस्थितीत श्री. पाठक यांना सपत्नीक पुरस्कार व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. पुरस्काराबद्दल श्री. पाठक यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
---