NSK26H29885
नंदुरबार : कार्यक्रमास उपस्थित वरुण भामरे, यशदीप कौशिक, मिलिंद शाह, प्रकाश पटेल, महेश चौधरी, दिग्विजय नरसे, संजय देसले, कमलेश चौधरी, फिरदोस लोखंडवाला, जितेंद्र कलाल, सुनील मगरे, सुहास जानवे, सुभाष चौधरी, सुशील नेतलेकर, विलीन धूरकुंडे आदी.
---
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या जयंती
इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे उत्साहात
नंदुरबार, ता. २१ : जिल्हा इंजिनिअर असोसिएशनतर्फे येथील सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. रायगड पुनर्विकासचे संशोधक वरुण भामरे,
हास्यकवी यशदीप कौशिक, नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, निवृत्त अभियंता गणपत गावित, प्रमोद चव्हाण, फ़य्याज खान आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
वरुण भामरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रायगड दुर्गाच्या वास्तुसंवर्धनाची माहिती देत गड-किल्ल्यांच्या लष्करी वास्तुशास्त्राचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच शिवकालीन जलव्यवस्थापन व बंधाऱ्यांच्या निर्मितीचा इतिहासही त्यांनी उलगडला. हास्यकवी यशोदीप कौशिक यांनी कवितांमधून देशातील विविध घटना, घडामोडींवर प्रकाश टाकला.
कार्यक्रम यशस्वितेसाठी नंदुरबार जिल्हा इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद शाह, प्रकाश पटेल, महेश चौधरी, दिग्विजय नरसे, संजय देसले, कमलेश चौधरी, फिरदोस लोखंडवाला, जितेंद्र कलाल, सुनील मगरे, सुहास जानवे, सुभाष चौधरी, सुशील नेतलेकर, विलीन धूरकुंडे यांनी परिश्रम घेतले.