धुळे टुडे २ साठी...
---
फोटो-NSK26H29880
धुळे : तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेतील डीआरसीपी पब्लिक स्कूलच्या विजेत्या संघासोबत मान्यवर.
---
डीआरसीपी पब्लिक स्कूल संघ विजयी
---
धुळे तालुकास्तरीय शालेय खो- खो स्पर्धा
---
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १७ : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयांतर्गत धुळे तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा शहरातील गरुड मैदानात नुकत्याच झाल्या. या स्पर्धेत मेहेरगाव येथील डीआरसीपी पब्लिक स्कूलच्या संघाने विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातील मुलींचे एकूण १६ संघ सहभागी होते. उपांत्य फेरीत सैनिकी स्कूल (मोराणे) व अंतीम फेरीत माध्यमिक विद्यालय (धनुर) संघावर मात करत डीआरसीपी पब्लिक स्कूल (मेहेरगाव) संघाने विजेतेपद पटकाविले. या विजेत्या संघात वैष्णवी पाटील, तृप्ती भामरे, हितेश्री देवरे, खुशी भामरे, तेजस्विनी वळखंडे, गुंजन भामरे, प्रणाली पाटील, दीप्ती शिंदे, विभूती भामरे, तन्वी भामरे, दामिनी भामरे, मयुरी भदाणे, निधी माळी, खुशबू चव्हाण, प्रांजली पाटील यांचा समावेश होता. क्रीडाशिक्षक ईश्वर भदाणे यांचे विजेत्या संघाला मार्गदर्शन लाभले. स्पर्धेवेळी राष्ट्रीय सुवर्णपदकप्राप्त खो- खो खेळाडू अविनाश वाघ, योगेश वाघ, धुळे तालुका संयोजक प्रशांत कांगणे, सचिव अक्षय हिरे, महेंद्र गावडे आदी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक डी. एल. भामरे, अध्यक्षा क्रांती रोठे, प्राचार्या ज्योत्स्ना देवरे, संचालक वैभव भामरे, कुमार रोठे, सर्व संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्या संघाचे कौतुक केले.
---