सेवा संकल्प अभियानाला

सेवा संकल्प अभियानाला
Published on
ॲंकर NSK26H29887 जळगाव : सेवा संकल्प अभियानात स्‍वच्‍छतेबाबत अंगणवाडी सेविकांना शपथ देण्यात आली. –––––––– गावागावांत स्वच्छता, विविध स्पर्धा अन् जनजागृतीपर उपक्रम जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात; ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : भारतासह संपूर्ण राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यातील सर्व पंधरा तालुक्यांमध्ये पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर विविध लोकाभिमुख उपक्रमांनी अभियानाला उत्साहात सुरुवात झाली. यात अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता व प्लास्टिकमुक्तीची शपथ देण्यात आली. अभियानाच्या माध्यमातून ‘सेवेतून समाधान आणि लोकसहभागातून ग्रामीण विकास’ हा संदेश देत नागरिकांना विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासोबतच स्वच्छता, पर्यावरण, शिक्षण, पोषण व जनजागृतीपर उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले. अभियानाच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी जिल्हास्तरावरून जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी भुसावळ तालुक्यातील खंडाळा व वांजोळा येथे भेट दिली. चौकट विविध दाखल्यांचे वाटप जळगाव तालुक्यात विविध दाखल्यांच्या वाटपाची विशेष मोहीम राबविण्यात आली. कानळदा येथे पुरातन विहिरीची स्वच्छता करून ऐतिहासिक जलस्रोताच्या संवर्धनाचा संदेश देण्यात आला. याशिवाय जामनेर, एरंडोल, चाळीसगाव, धरणगाव, पाचोरा, पारोळा, भडगाव, अमळनेर, चोपडा, यावल तालुक्‍यांमध्‍ये जन्म व विवाह दाखल्यांचे नागरिकांना वितरण. अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा तसेच आरोग्य उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्वच्छतेवर भर देण्यात आला. याशिवाय ग्रामपंचायतींमध्ये विशेष सभा, शाळांमध्ये चित्रकला, रांगोळी व स्वच्छता उपक्रम देखील राबविले. ––––––––––

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com