जिल्ह्यात १९, २० तारखेसह २६, २७ला मतदार नोंदणी

जिल्ह्यात १९, २० तारखेसह २६, २७ला मतदार नोंदणी
Published on
मतदार नोंदणीसह यादीतील दुरुस्तीसाठी संधी उपशीर्षक १९, २०, २६, २७ ला मोहीम; जिल्ह्यात विशेष पुनरीक्षण शिबिर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम- २०२६’ अंतर्गत नागरिकांच्या सोयीसाठी १९ व २०, तसेच २६ व २७ सप्टेंबरला विशेष शिबिर होणार आहे. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ हा कालावधी दावे व हरकती सादर करण्यासाठी निश्चित केला आहे. या कालावधीत नवीन मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती तसेच नाव वगळण्यासाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. प्रारूप मतदारयादीत नाव समाविष्ट न झालेल्या किंवा स्थलांतरित/गैरहजर असल्यामुळे नोंद सुटलेल्या नागरिकांना, तसेच १ ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नवमतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या केंद्रांवर वरील दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत उपस्थित राहतील. मोहिमेत या बाबींचा समावेश शिबिरांत नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नावे व तपशिलांची दुरुस्ती, तसेच नाव वगळण्याचे अर्ज भरून घेण्याची कामे होणार आहेत. नवयुवकांसाठी १ ऑक्टोबर व त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नवमतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदविण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयीन स्तरावरही विशेष प्रयत्न केले जात आहेत. विशेष शिबिरांमध्ये महिला आणि दिव्यांगांच्या मतदार नोंदणीस विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. सर्व पात्र नागरिक, नवमतदार आणि ज्यांचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट नाही, अशा सर्व संबंधितांनी जवळच्या मतदान केंद्रावर भेट देऊन विशेष शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत किंवा आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com