धुळे टुडे २ साठी...
---
फोटो- NSK26H29894
धुळे : पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत पात्र कामगारांना वाढीव कर्ज, प्रशिक्षण द्या या मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी संजय बागडे यांना देतांना भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी.
---
कामगारांना वाढीव कर्ज, प्रशिक्षण द्या
---
भारतीय मजदूर संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १७ : पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत पात्र कामगारांना दोन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करावे, कामगारांना प्रशिक्षण द्यावे आदी मागण्या भारतीय मजदूर संघाच्या जिल्हा शाखेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले.
भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त देशभर १७ सप्टेंबर हा कामगार दिवस म्हणून पाळला जातो. या दिवसाचे औचित्य साधत असंघटित कामगार विश्वकर्मा संकल्प परिवाराच्या विविध मागण्या भारतीय मजदूर संघांने केल्या आहेत. यात पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत ज्या कामगारांना एक लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात आले. त्यापैकी अनेक कामगारांनी कर्जाची परतफेड केली असल्याने पात्र कामगारांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच ज्या कामगारांचे प्रशिक्षण अद्याप झालेले नाही, त्यांच्यासाठी जिल्ह्यात प्रशिक्षण वर्ग सुरू करावा, विश्वकर्मा योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या विविध घटकांना योजनेचा लाभ तातडीने मिळावा तसेच संबंधित घटकांचे प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करण्यात यावे आदी मागण्या संघटनेतर्फे करण्यात आल्या. भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर सोनवणे, कार्याध्यक्ष सुनिल देवरे, घरेलू कामगार विभागाच्या उपाध्यक्षा संगीता चौधरी, नरेंद्र मोरे, सचिव गुलाबराव भामरे, अनुजा देशपांडे आदींनी मागण्यांचे निवेदन जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संजय बागडे यांना दिले.
---