धुळे टुडे आज मस्ट

धुळे टुडे आज मस्ट
Published on
धुळे ः टुडे २ किंवा टुडे ३ साठी --- फोटो क्रमांक ः 29895 धुळे : बाजार समितीत कुणाल पाटील यांचा सत्कार करताना अनुप अग्रवाल. शेजारी भाजपचे पदाधिकारी. --- जिल्हा दुष्काळी जाहीर करावा - कुणाल पाटील : मुख्यमंत्री फडणवीसांकडे पाठपुरावा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १७ : धुळे तालुक्यासह जिल्ह्यात गंभीर दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, शासनाने जिल्हा दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना सर्व सवलती व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली असून, मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा प्रश्न लावून धरल्याची माहिती माजी आमदार कुणाल पाटील यांनी दिली. धुळे तालुक्यातील प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जनसेवेचे व्रत सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले. येथील बाजार समितीच्या आवारात श्री. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर झाले. त्या वेळी ते बोलत होते. आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागातून १२६ जणांनी रक्तदान केले. बाजार समितीतर्फे श्री. पाटील यांचा सत्कार झाला. महापौर मायादेवी परदेशी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, अश्‍विनी कुणाल पाटील, उपमहापौर जोत्स्ना पाटील, भाजप शहर- जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, स्थायी सभापती लताताई सोनार, बाजार समिती सभापती योगेश पाटील, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा धरती देवरे, रायबा कुणाल पाटील आदी उपस्थित होते. डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. - आज विविध उपक्रम माजी आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एसएसव्हीपीएस महाविद्यालयात शुक्रवारी (ता. १८) रक्तदान शिबीर होणार आहे. मुकटी (ता. धुळे) येथे शुक्रवारी जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना मिष्टान्न वाटप करण्यात येईल. तसेच, शनिवारी (ता. १९) रात्री नऊला मुकटीतील श्रीराम मंदिर चौकात ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे कीर्तन होणार आहे. धुळे येथील सावली वृद्धाश्रमात पवन साळुंखे, वरुण साळुंखे यांच्यातर्फे अन्नदान सोहळा होईल. उडाणे (ता. धुळे) येथे शुक्रवारी सायंकाळी सहाला रविकीरण महाराज यांचे कीर्तन होणार असून, नागरिकांना उपस्थितीचे आवाहन धर्मराज बागुल यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com