गणरायाला निरोप देताना मेहरूण तलावाचेही रूप खुलणार

गणरायाला निरोप देताना मेहरूण तलावाचेही रूप खुलणार
Published on
मेनफिचर शहर टुडे पानासाठी ------------------ गणरायाला निरोप देताना मेहरुण तलावाचे खुलणार रूप -------- मुख्य विसर्जन मार्ग ५.२० किलोमीटरचा; गणेशघाट सुशोभीकरणासह स्वच्छतेवर भर, ६ क्रेन, ५ तराफे तैनात सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : गणरायाच्या विसर्जनाला अजून आठ दिवस बाकी असले तरी या सोहळ्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका प्रशासनाने आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे. मेहरूण तलाव परिसरात यंदा स्वच्छता व सुरक्षतेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित व सुसज्ज सुविधा मिळाव्यात, यासाठी गणेश घाटाचे सुशोभीकरण, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था व सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रशासनाने भर दिला आहे. शहरात विसर्जनासाठी तब्बल ५.२० किलोमीटरचा मुख्य मार्ग निश्चित करण्यात आला आहे. लहान व मोठ्या मूर्तींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. चार फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन मेहरूण तलावावरील गणेश घाटावर करण्यात येणार आहे. त्यापेक्षा मोठ्या मूर्तींसाठी सेंट टेरेसा स्कूल मार्गाने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनाच्या दिवशी महापालिकेचे ५०हून अधिक कर्मचारी तीन सत्रात (शिफ्ट) कार्यरत राहणार आहेत. या तयारीचा आढावा गुरुवारी (ता.१७) सायंकाळी महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांनी मेहरुण तलावार जावून घेतला. यावेळी उपायुक्तांसह, आरोग्य अधिकारी देखील उपस्थित होते. मोठ्या मूर्तींसाठी सहा क्रेन मोठ्या व वजनदार मूर्तींचे सुरक्षित विसर्जन करण्यासाठी सहा क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. तलावात पाच भक्कम तराफे तैनात ठेवण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी, यासाठी दोन हाय-स्पीड मोटरबोट व जेसीबी सज्ज ठेवण्यात येणार आहे. २५ जणांचे विशेष शोध व बचाव पथकही तैनात राहणार आहे. घाटाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष गणेश घाटावर निर्माल्य व कचरा साचू नये, यासाठी स्वच्छतेची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. घाट परिसराची नियमित स्वच्छता करण्यासोबतच विसर्जन मार्ग व भाविकांच्या वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. घाटपरिसराचे सुशोभीकरण करून भाविकांसाठी वातावरण अधिक आकर्षक व सुरक्षित करण्याचे कामही सुरू आहे. दीडशे ठिकाणी बॅरिकेडिंग विसर्जन मिरवणूक मार्गावर १५० ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे. दर ३० मीटर अंतरावर अतिरिक्त प्रकाशव्यवस्था, तर तलाव परिसरात पाच लाईट टॉवर उभारण्यात येणार आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास अडचण येऊ नये म्हणून जनरेटरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रथमोपचार केंद्रासह रुग्णवाहिका राहणार आपत्कालीन प्रसंगासाठी प्रथमोपचार केंद्रासह २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे विसर्जन सोहळा शांततेत, सुरक्षित व सुरळीत पार पडावा, यासाठी महापालिका प्रशासनाने विविध विभागांचा समन्वय साधून तयारीला अंतिम रूप देण्यास सुरुवात केली आहे. --------- कोट गणरायाच्या विर्सजनाची सर्व तयारी आम्ही सुरू केली आहे. त्यानुसार मेहरुण तलाव येथील सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता यावर विशेष भर दिला आहे. विर्सजन मार्गावरीलदेखील तयारी सुरू केलेली आहे. - आदित्य जिवने, आयुक्त, महापालिका, जळगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com