मतदान केंद्रांवर उद्यापासून दोनदिवस शिबिर

मतदान केंद्रांवर उद्यापासून दोनदिवस शिबिर
Published on
मतदान केंद्रांवर उद्यापासून दोनदिवस शिबिर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद : मतदारांना नाव नोंदणीची संधी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : मतदार यादी विशेष पुर्नरिक्षण मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर शनिवारी (ता.१९) आणि रविवारी (ता.२०) विशेेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात प्रारूप यादीत नाव समाविष्ट नसलेल्या नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविणे, नोंदीमध्ये दुरुस्ती करणे तसेच नाव वगळण्याबाबत हरकत नोंदविता येईल. तसेच नवमतदारांना नावनोंदणीची संधी उपलब्ध असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. जिल्ह्याभरात आयोजित विशेष शिबिरामध्ये सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे केंद्रावर उपस्थित राहतील. हे बीएलओ नागरिकांकडून मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्ती तसेच नाव वगळण्यासंदर्भातील अर्ज स्वीकारणार आहेत. १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नव मतदारांना, तसेच प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र नागरिकांना नमुना-६ व घोषणापत्र भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध आहे. मतदार यादीत नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना-८ सोबत घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करता येतील. संबंधित मतदारसंघातील मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळण्याबाबत नमुना-७ भरून हरकत नोंदविता येईल. दरम्यान, ऑनलाइन सर्व अर्ज voters.eci.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. नागरिकांनी या शिबिरात सहभाग घ्यावा, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com