धुळे ः टुडे १ साठी
--
फोटो क्रमांक ः 29906 व 29907
धुळे : ‘एफडीए‘ने जप्त केलेला साठा.
--
तुपासह बुंदीचा साठा जप्त
-
अन्न सुरक्षा विभाग : ६२१ किलो साठा ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १७ : अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार येथील अन्न सुरक्षा विभागाने शहरातील विविध अन्न आस्थापनांची तपासणी केली. कुमारनगर परिसरातील दोन आस्थापनांवर केलेल्या कारवाईत गाईचे व म्हशीचे तूप, तसेच बुंदी व बुंदीच्या लाडूंचा एकूण ६२१ किलो साठा संशयाच्या आधारे जप्त करण्यात आला.
-
कुमारनगर (साक्री रोड) येथील गायत्री ट्रेडर्सची तपासणी करून गाईचे व म्हशीचे तुपाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. यावेळी ४६३ किलो तूप, अंदाजे तीन लाख ८०० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. त्याच परिसरातील रियल गृह उद्योग येथे तपासणी करून बुंदी व बुंदीच्या लाडूंचे नमुने घेण्यात आले. या कारवाईत १५८ किलो, २५ हजार २०० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. दोन्ही आस्थापनांतून घेतलेले नमुने अधिकृत प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात येणार आहेत. अहवालानुसार संबंधितांवर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. सहायक आयुक्त (अन्न) गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, अरविंद राऊत, मंगेश भावसार यांनी ही कारवाई केली.