धुळे ः टुडे १ साठी
--
फोटो क्रमांक ः 29916...अनुप अग्रवाल
--
धुळ्यात बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजूर
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १७ : येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘जीएनएम’ पदविका महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन करून, १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याकामी पाठपुराव्यास यश आल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली. यामुळे सुविधेमुळे खानदेशातील विद्यार्थ्यांना धुळ्यातच उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.
ते म्हणाले, की आरोग्य सेवेतील परिचारिकांची वाढती गरज लक्षात घेता शासनाने राज्यातील आठ जीएनएम महाविद्यालयांच्या श्रेणीवर्धनाला मंजुरी दिली आहे. यात धुळ्याचा समावेश असून, यामुळे दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचे नर्सिंग शिक्षण घेता येणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना कमी खर्चात दर्जेदार शिक्षण मिळणार असून, हिरे रुग्णालयालाही वैद्यकीय सेवेसाठी प्रशिक्षित मदत लाभणार आहे.
शासकीय संस्थेत ही संधी उपलब्ध झाल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही परवडणारे शिक्षण मिळेल. जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात प्रत्यक्ष रुग्णसेवेचे प्रशिक्षण मिळाल्याने संबंधितांचा कौशल्यविकास होईल. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासकीय व खासगी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. खानदेशात प्रशिक्षित परिचारिकांची संख्या वाढून आरोग्य यंत्रणेला बळ मिळेल. स्थानिक स्तरावर दर्जेदार शिक्षण मिळेल. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने पूर्ण झाली आहे. यामुळे धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना बाहेरगावी जाण्याची गरज उरलेली नाही, असे आमदार अग्रवाल म्हणाले.