‘देशभक्त जेठमल सारस्वत’
पुस्तकाचे उद्या प्रकाशन
उपशीर्षक
क्रांतिकारकांच्या कथांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : येथील शिक्षक तथा इतिहासाचे अभ्यासक जगदीश बियाणी यांनी लिहिलेल्या ‘देशभक्त जेठमल सारस्वत’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (ता.२०) जळगावात होत आहे.
जिल्हा नियोजन भवनात रविवारी सकाळी १० वाजता विशेष सरकारी वकील तथा राज्यसभा सदस्य खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ. व्ही.एल. माहेश्वरी तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्राचार्य डॉ.बी.एन. पाटील उपस्थित असतील.
असे आहे पुस्तक
पुस्तकात लेखकाने एकूण १६ ऐतिहासिक क्रांती कथांचा समावेश समावेश केलेला आहे. १०४ पृष्ठ असलेल्या या पुस्तकात प्रस्तावना व मनोगत यासह २९ चित्रांचा समावेश आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ हे जेठमल सारस्वत यांच्या चित्रांसह भगतसिंग राजगुरू सुखदेव व चंद्रशेखर आजाद या महान चित्रांचा समावेश आहे. मल पृष्ठावर हे भगवानदास अग्रवाल यांना पिस्तूल पुरवण्याच्या आरोपावरून जेठमल सारस्वत यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या दहा व्यक्तींना अटक करण्यात येऊन त्यांच्यावर खटला भरण्यात आला होता, त्यासंबंधी प्रसंगाचे चित्र आहे. पुस्तकाला विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील यांची प्रस्तावना लाभलेली आहे. क्रांतिकारकांच्या चळवळीचा जळगावशी असलेला संबंध व त्या संबंधातून जेठमल सारस्वत यांनी क्रांतिकारकांना केलेली मदत यासह विविध कथांमधून एकूणच स्वातंत्र्यलढ्याचा आढावा पुस्तकातून घेण्यात आला आहे.
------