NSK26H29929
जळगाव : हिरकणी कक्षाच्या लोकार्पणप्रसंगी ॲड. नारायण लाठी, डॉ. राजेश पाटील, डॉ. भूषण सोमाणी, डॉ. पूजा सोमाणी, अनिल कांकरिया, रेल्वेस्थानक अधीक्षक कौस्तुभ चौधरी.
–––
रेल्वेस्थानकावर रोटरीच्या
हिरकणी कक्षाचे लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : रोटरी क्लब जळगावतर्फे जळगाव रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर हिरकणी कक्षाचे रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी ॲड. नारायण लाठी, डॉ. भूषण सोमाणी, डॉ. पूजा सोमाणी, सहप्रांतपाल अनिल कांकरिया, रेल्वेस्थानक अधीक्षक कौस्तुभ चौधरी यांची विशेष उपस्थिती होती.
प्रवासादरम्यान माता आणि त्यांच्या बाळांना स्तनपानासाठी सुरक्षित, स्वच्छ, खाजगी आणि आरामदायी जागा रोटरीच्या हिरकणी कक्षाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. मातृत्वाचा सन्मान आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम अनेक मातांसाठी निश्चितच आधार देणारा ठरेल; असा विश्वास ॲड. नारायण लाठी यांनी व्यक्त केला. यावेळी हिरकणी कक्षाच्या निर्मितीसाठी सहकार्य लाभलेल्या राजेश सुराणा व चिराग जैन यांचा सत्कार करण्यात आला. मानद सचिव स्वाती ढाके यांनी सूत्रसंचालन केले. तर नॉन मेडिकल कमिटी चेअरमन रितेश जैन यांनी आभार मानले. कार्यक्रमास रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची, प्रेम कोगटा, सहप्रांतपाल ॲड. सागर चित्रे, प्रेसिडेंट एन्क्लेव्ह दिलीप गांधी या मान्यवरांसह रोटरी क्लब जळगावच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.