NSK26H29934
जळगाव : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरात नागरिकांची तपासणी करताना डॉक्टर, तसेच उपस्थित मान्यवर व रोटरी सदस्य.
----------
आरोग्य शिबिरास तीनशे जणांची तपासणी
उपशीर्षक
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, रोटरी क्लब नॉर्थचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थ यांच्यातर्फे तसेच महादेव हॉस्पिटल व नेत्रज्योती हॉस्पिटल यांच्या सहकार्याने बाजार समिती परिसरात मोफत भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराला नागरिक, व्यापारी, शेतकरी, कामगार व बाजार समिती परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदाब, मधुमेह, ईसीजी, कार्डिओग्राफ तसेच इतर आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. नेत्र तपासणीदरम्यान गरजूंना ० ते २ नंबरपर्यंतचे चष्मे मोफत उपलब्ध करून देण्यात आले. यासोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील (लकी टेलर) यांचे विशेष सहकार्य लाभले.
रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थचे अध्यक्ष उमेश पाटील, सचिव (ऍडमिन) रुपेश सरोदे व सचिव (प्रोजेक्ट) प्रशांत अग्रवाल, चंदन कोल्हे, पवन जैन, अंकित चौधरी, कुणाला महाजन, हितेंद्र धांडे, समीर चौधरी, वर्धमान जैन, प्रकल्प अध्यक्षा व क्लब एडिटर कश्मीरा जैन आदींनी परिश्रम घेतले.
----
चौकट
तीनशेवर रुग्णांची तपासणी
शिबिराच्या माध्यमातून एकूण ३५४ नागरिकांची आरोग्य तपासणी, २०१ नागरिकांची नेत्र तपासणी, ११८ जणांना चष्मे वाटप तसेच ३५ नागरिकांचे मोतीबिंदू ऑपरेशन चे निदान झाले. २६ नागरिकांची ईसीजी तपासणी आणि ३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.