टी.बी. सेंटर परिसरातील अस्वच्छतेवर महापौरांची नाराजी

टी.बी. सेंटर परिसरातील अस्वच्छतेवर महापौरांची नाराजी
Published on
NSK26H29933 जळगाव : टीबी सेंटर येथील कचरा संकलन केंद्राची पाहणीप्रसंगी मक्तेदार यांच्याकडून प्रकल्पाच्या कामाची माहिती घेताना महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, शहर अभियंता योगेश बोरोले, मक्तेदार व आदी. ---- टीबी सेंटरमधील अस्वच्छतेवर महापौरांची नाराजी घंटागाड्यांच्या देखभालीबाबत ‘बीव्हीजी’च्या प्रतिनिधीला विचारला जाब सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १८ : जुन्या टीबी सेंटर परिसरातील नवीन सुरू असलेल्या कचरा संकलन केंद्रासह विविध कामांचा आणि स्वच्छतेच्या स्थितीचा महापौर दीपमाला काळे यांनी पाहणी दौऱ्यात आढावा घेतला. परिसरातील अस्वच्छता तसेच कामातील त्रुटी निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित सफाई ठेकेदाराला सूचना देत कामकाजात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. घंटागाड्यांची नियमित स्वच्छता आणि देखभाल होत नसल्याबद्दल बीव्हीजी कंपनीच्या प्रतिनिधीलाही त्यांनी जाब विचारला. या वेळी उपमहापौर मनोज चौधरी, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, शहर अभियंता योगेश बोरोले, अभियंता योगेश वाणी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. महापौरांनी परिसरातील कचरा संकलन केंद्रासाठी तयार केल्या जाणाऱ्या रॅम्पच्या बांधकामाची पाहणी केली. कामात आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याच्या सूचना त्यांनी विकासकाला दिल्या. शहर अभियंता बोरोले यांनी रॅम्पवर वाहन चढवून केलेल्या चाचणीचा व्हिडीओ महापौरांना दाखविला. रॅम्पवर बंदिस्त छताची व्यवस्था करण्यात आल्याने भविष्यातील कामकाज अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा अभियंत्यांनी व्यक्त केली. अनेक घंटागाड्या नादुरुस्त घंटागाड्यांची स्वच्छता का केली जात नाही, याबाबत महापौरांनी बीव्हीजीच्या प्रतिनिधीला प्रश्न विचारत त्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी शहरातील ८८ पैकी ६० घंटागाड्या सध्या कार्यरत असून, काही वाहनांचे सुटे भाग उपलब्ध होत नसल्याने त्या नादुरुस्त असल्याचे प्रतिनिधीने सांगितले. नादुरुस्त सर्व घंटागाड्यांची त्वरित दुरुस्ती करून त्या सेवेत आणाव्यात, अशा सूचना महापौर काळे यांनी दिल्या. चौकट घंटागाड्यांसाठी रस्ते चांगले करा घंटागाड्यांच्या येण्या-जाण्यासाठी रस्ता तत्काळ सरळ करावा आणि शहरातील कचरा साचण्याची समस्या लवकरात लवकर दूर करावी तसेच कचरा संकलन करतांना प्रत्येक घरातून कचरा संकलीत झाला पाहिजे, अशा प्रकराचे नियोजन करण्याच्या सूचना महापौरांनी बीव्हीजी कंपनीच्या प्रतिनिधीला दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com