पाच दिवसांच्या गणरायासोबत
ज्येष्ठा गौराईला आज निरोप
(उपशीर्षक)
महालक्ष्मीचे विधीवर पूजन करत दिला नैवेद्य
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : गणेशोत्सव सुरू होऊन पाच दिवस झाले. यंदाचा उत्सव बारा दिवसांचा आहे. सोमवारी गणपती विराजमान झाल्यानंतर तिथीत बदल झाला असल्याने पाचव्या दिवसाच्या गणपतीचे विसर्जन उद्या (ता.१९) केले जाणार आहे. अर्थात तीन दिवस माहेराला येणाऱ्या गौराईला देखील पाचव्या दिवसाच्या गणपतीसोबतच विसर्जित करणे योग्य मानले जात आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणेशोत्सवाला सुरवात हेात असते. यानंतर दहा दिवस उत्सव चालत असतो. यंदा मात्र तिथींचा क्षय झाल्यामुळे बारा दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. हरतालिका व श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी आली आहे. १४ सप्टेंबरला गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आज (ता.१८) उत्सवाचा पाचवा दिवस होता. अर्थात पाचव्या दिवसाचे विसर्जन आज झाले असते. परंतु ज्येष्ठा गौराईचे गुरूवारी (ता.१७) आगमन झाल्यानंतर आज नैवेद्य दाखविण्यात आला.
चौकट
गौराईचे घराघरांत पूजन
गौराईचे (महालक्ष्मी) गुरुवारी (ता.१७) आगमन झाले. यानंतर आज (ता.१८) गौरीपूजन व नैवेद्य दाखविण्यात आला. यानंतर उद्या (ता.१९) विसर्जन होणार आहे. गौराईसोबतच पाचव्या दिवसाच्या गणपतीचे विसर्जन देखील केले जाईल. परंपरेनुसार काही ठिकाणी गौराईंचे विसर्जन गणरायासोबत, तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे केले जाते.