NSK26H29944
जळगाव : शहर जिल्हा काँग्रेसतर्फे प्रभागांतील समस्याबाबत महापौर दीपमाला काळे यांना निवेदन देताना काँग्रेसचे पदाधिकारी.
......
प्रभागांतील समस्या सोडविण्याचे महापौरांचे आश्वासन
कचरा, पथदीप, मोकाट श्वान व आरोग्य प्रश्नांवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची चर्चा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : शहरातील प्रभाग क्रमांक ७ ते ११ मधील विविध नागरी समस्यांबाबत शहर जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (१८) महापौर दीपमाला काळे यांची भेट घेऊन चर्चा केली. कचरा संकलन, पथदीप, मोकाट श्वान तसेच आरोग्यविषयक समस्यांकडे यावेळी महापौरांचे लक्ष वेधण्यात आले.
शहर जिल्हाध्यक्ष जमील शेख व ब्लॉक अध्यक्ष अनंत परिहार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी महापौरांसमोर संबंधित समस्या मांडल्या. विद्युत विभागाचे अभियंता मोरे यांच्यासमक्ष पथदिव्यांच्या प्रश्नावरही चर्चा झाली. नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. महापौर काळे यांनी संबंधित विभागांच्या जबाबदार अधिकाऱ्यांना समक्ष बोलावून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच पुढील ८ ते १५ दिवसांत संबंधित समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष जगदीश गाढे, राहुल भालेराव, विशाल पवार, सरचिटणीस अमजद पठाण, मालोजीराव पाटील, कफिल अहमद, अरुणाताई पाटील, अनिता कोळी आदी उपस्थित होते.