भुसावळात ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी

भुसावळात ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी
Published on
सेकंडमेनफिचर ----------- NSK26H29952 भुसावळ : ध्वनीमापक यंत्राचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करताना पोलिस. -------------- नियमांचे उल्लंघन केल्यास साहित्य जप्त ------ ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजेचालकांना पोलिसांची सक्त ताकीद सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. १८ : सणोत्सव व मिरवणुका शांततेत व शिस्तीत पार पडाव्यात, नागरिकांना ध्वनीप्रदूषणाचा त्रास होऊ नये, यासाठी भुसावळ पोलिसांकडून डीजेचालक व साऊंड सिस्टीम ऑपरेटरना ध्वनी मर्यादेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अष्टभुजा चौकात शहरातील डीजेचालक, साऊंड सिस्टीममालक व ऑपरेटर यांची विशेष कॉर्नर बैठक नुकतीच घेण्यात आली. त्यात डीजेचालकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी साहित्य जप्त करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी डीजेचालकांना दिला. या बैठकीला बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, उपविभागीय गोपनीय शाखेचे अंमलदार उपस्थित होते. यावेळी पोलिस प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना व ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००अंतर्गत निर्धारित ध्वनीमर्यादांची माहिती उपस्थितांना दिली. शांतता क्षेत्रात दिवसा ५० डेसिबल, तर रात्री ४० डेसिबल, रहिवासी क्षेत्रात दिवसा ५५ व रात्री ४५ डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ व रात्री ५५ डेसिबल, तर औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ व रात्री ७० डेसिबलपर्यंत ध्वनीमर्यादा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. ध्वनीमापक यंत्राचे प्रात्यक्षिक या बैठकीत पोलिसांनी डिजिटल ध्वनीमापक यंत्राचा प्रत्यक्ष वापर करून दाखवला. आवाजाची तीव्रता कशी मोजली जाते, घटनास्थळी ध्वनी नमुने कशा पद्धतीने नोंदविले जातात व निर्धारित मर्यादेपेक्षा आवाज वाढल्यास यंत्रावर त्याची नोंद कशी होते, याचे प्रात्यक्षिक ऑपरेटरना दाखविण्यात आले. रात्री दहानंतर उच्चक्षमतेच्या ध्वनिक्षेपकांवर निर्बंध असून, विशेष दिवसांसंदर्भातील लागू असलेल्या वेळेच्या नियमांचेही पालन करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. निर्धारित डेसिबलमर्यादा ओलांडून कर्णकर्कश आवाज करणे, क्षमतेपेक्षा अधिक बेस वाजविणे किंवा न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन करणे असे आढळल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणारे ध्वनिक्षेपक व साऊंड सिस्टीमचे साहित्य जप्त केले जाऊ शकते, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला. सहकार्य करण्याचे आवाहन नागरिक, रुग्ण, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून साऊंड सिस्टीमचालकांनी कायदेशीर मर्यादेतच आवाज ठेवावा व सणणोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com