धुळे ः टुडे २ किंवा टुडे ३ साठी
---
फोटो क्रमांक ः 29949
धुळे ः गरुड मैदानावरील हॅन्डबॉल स्पर्धेवेळी प्राचार्या चित्रा पवार यांचे स्वागत करताना सत्यजित सिसोदे.
---
हॅन्डबॉल स्पर्धेत ६० संघांचा सहभाग
धुळ्यात गरुड मैदानावर जिल्हा आंतरशालेय स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ ः जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि जिल्हा हॅन्डबॉल असोसिएशनतर्फे गरुड मैदानावरील हॅन्डबॉल ट्रेनिंग सेंटरमध्ये जिल्हास्तरीय आंतरशालेय हॅन्डबॉल स्पर्धा झाली. क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत विविध वयोगटांतील एकूण ६० संघांनी सहभाग नोंदविला.
एस. आर. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या चित्रा पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. जिल्हा क्रीडाधिकारी एम. के. पाटील, जिल्हा हॅन्डबॉल संघटनेचे उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे, डॉ. नरेश बागल, डॉ. नितीन वाळके, मनदीपसिंग पंजाबी, क्रीडा राज्य मार्गदर्शक श्वेता गवळी, करण पाटील, देवीदास मोरे, विश्वास पाटील, चेतन मोरे, पंकज बागूल आदी प्रमुख पाहुणे होते. जिल्हा हॅन्डबॉल संघटनेचे सचिव निखिल मोरे, सुमीत बिसावा, डॉ. नितीन वाळके, पल्लवी केळकर उपस्थित होते. स्पर्धेत १७ वर्षांखालील वयोगटांतील खेळाडूंमध्ये उत्साह दिसला.