नंदुरबार सुप्रीमो क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

नंदुरबार सुप्रीमो क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात
Published on
फोटो : NSK26H29985 नंदुरबार : येथील लिओ लायन्स सुप्रीमो क्लबच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर. ----------------- नंदुरबार सुप्रीमो क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात नंदुरबार : समाजकार्याची ओळख उमलत्या वयातच व्हावी म्हणून लायन्स क्लबमध्ये २५ खालील वयोगटातील मुला- मुलींसाठी लायन्स क्लबमध्ये ‘लिओ क्लब’ व्यवस्था असते. त्या अंतर्गत नंदुरबार येथे लिओ लायन्स क्लबने ‘नंदुरबार सुप्रीमो क्लबची’ स्थापना करण्यात आली. या कार्यकारीणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. यामध्ये अध्यक्ष धनश्री कोतवाल, सचिव मानस्वी चौधरी, ट्रेझरर आगम शाह यांची निवड झाली. याप्रसंगी इंस्टालिंग ऑफिसर म्हणून लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४ एच२ च्या उपप्रांतपाल सुप्रिया कोतवाल होत्या. नवीन सदस्यांना इंडक्शन ऑफिसर म्हणून झोन चेअरमन पिनल शाह उपस्थित होत्या. सुप्रिया कोतवाल यांनी लायन्सचा गौरवशाली इतिहास सांगितला. समाजाला उपयुक्त सेवा प्रकल्प कसे घ्यावे, याबाबत माहिती दिली. पिनल शाह यांनी विद्यार्थीदशेत समाजकार्य करताना आपले शैक्षणिक क्षेत्रात करियर घडविण्याचे आवाहन केले. नूतन अध्यक्ष धनश्री कोतवाल यांनी आभार मानले. निर्माल्य संकलन या प्रोजेक्टची माहिती देण्यात आली. या वेळी पालक क्लबच्या अध्यक्षा रागिणी पाटील, सचिव चेतना गोस्वामी, किरण गायकवाड, हीना रघुवंशी, शितल चौधरी, रंजना बोरसे, सारिका जमादार, जया जैन, तेजल चौधरी, नेहा पारेख, मेघना परदेशी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com