NSK26H29990
जळगाव ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेत बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर. शेजारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंतराव भदाणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शाबाना शहा आदी.
---
अंमलबजावणी कागदोपत्री न राहता सकारात्मक परिणाम हवेत
(उपशीर्षक)
सीईओ नायर यांच्या सूचना; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची अंमलबजावणी केवळ कागदोपत्री न राहता त्याचे सकारात्मक परिणाम ग्रामस्थांना प्रत्यक्ष जाणवले पाहिजेत. यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिल्या.
ग्रामविकास विभागातर्फे जाहीर झालेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची’ ग्रामीण पातळीवर प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी व्हावी, तसेच अभियानाच्या निर्धारित उद्दिष्टांची योग्य पद्धतीने पूर्तता व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेतर्फे झालेल्या एकदिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंतराव भदाणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शाबाना शहा, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद चावरिया, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुहास सुपे व अधिकारी उपस्थित होते.
ग्रामपंचायतींनी अभियानातील प्रत्येक घटकाचा बारकाईने अभ्यास करून निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे आदेशही श्रीमती नायर यांनी दिले. दोन सत्रांत झालेल्या कार्यशाळेत अभियानाच्या विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणेला अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक दिशा व कार्यपद्धती याबाबतही मार्गदर्शन केले.