अडीच लाखांचा बनावट गुलाल मुद्देमाल जप्त

अडीच लाखांचा बनावट गुलाल मुद्देमाल जप्त
Published on
NSK26H29995 नंदुरबार : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जप्त केलेला बनावट गुलाल. --- बनावट गुलाल कारखान्यावर छापा होळ शिवारातून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १८ : विनापरवाना गुलाल तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. डोलोमाइट पावडरमध्ये विविध रंग मिसळून हा गुलाल तयार केला जात होता. ‘सनफ्लावर ब्राण्ड’ नावाने या गुलालाची विक्री केली जाणार होती. पोलिसांनी या कारवाईत दोन लाख ५४ हजार ५०० रुपयांचा गुलाल, कच्चा माल, यंत्रसामग्री व इतर साहित्य जप्त केले आहे. नंदुरबार तालुक्यातील होळ शिवारात असलेल्या दहिंदुले रस्त्यालगत ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील होळ शिवारात दहिंदुले रस्त्यालगतच्या पत्र्याच्या गुदामावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणी मजूर गुलालाच्या गोण्या भरताना दिसून आले. दोन लोखंडी मिक्सरमध्ये डोलोमाइट पावडर व विविध रंगांचे मिश्रण केले जात होते. सागर खंडेलवाल याने जितेंद्र मराठे (रा. नंदुरबार) यांच्याकडून गुदाम भाडेतत्त्वावर घेतले होते. डोलोमइट पावडरमध्ये रंग मिसळून बनावट गुलाल तयार करून विक्री केली जात होती. खंडेलवालने केवळ उद्योग व जीएसटी नोंदणी केलेली होती. मात्र गुलालनिर्मितीबाबत कोणताही अधिकृत परवाना त्याच्याकडे नव्हता. स्टॉक रजिस्टर, तसेच खरेदी-विक्रीच्या पावत्याही त्याच्याकडे आढळून आल्या नाहीत. या कारवाईत २० गोण्यांमधील सुमारे एक हजार किलो डोलोमाइट पावडर, ‘सन फ्लावर ब्राण्ड’च्या ४३० गोण्यांमध्ये भरलेला पिवळा, फिकट गुलाबी व गडद गुलाबी गुलाल, पिवळा व गुलाबी रंग प्रत्येकी तीन किलो कच्चा माल जप्त करण्यात आला. यासह दोन लोखंडी मिक्सर, वजन काटा, कंपनीचे गोणी शिवण्याचे मशिन आणि १०० रिकाम्या प्लॅस्टिक गोण्या, असा एकूण दोन लाख ५४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी डोलोमाइट पावडर, विविध रंग व मिक्सरमधील मिश्रणाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. दोन्ही मिक्सर सील करण्यात आले. या प्रकरणी अभय राजपूत यांच्या फिर्यादीनुसार नंदुरबार शहर पोलिसांत सागर मनिलाल खंडेलवाल (रा. सरगम कॉलनी, गिरीविहार गेट, नंदुरबार) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक महेंद्र जाधव तपास करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलिस उपनिरीक्षक विकास गुजांळ, दिनेश चित्ते, मुकेश तावडे, दिनेश वसुले, सुनील येलवे, विनोद पाटील, रवींद्र अहिरे, हेमंत बारी, राहुल पांढारकर, विशाल मराठे, अभय राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com