गणरायाच्या जयघोषाने दुमदुमले डी. आर. महाविद्यालय

गणरायाच्या जयघोषाने दुमदुमले डी. आर. महाविद्यालय
Published on
फोटो :NSK26H30010 नंदुरबार : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शहर पोलिस निरीक्षक संदीप पाटील. ------------------- विद्यार्थ्यांनी शिस्त, वेळेचे नियोजन करावे संदीप पाटील : गणरायाच्या जयघोषाने दुमदुमले डी. आर. महाविद्यालय नंदुरबार, ता. १९ : विद्यार्थ्यांनी शिस्त, वेळेचे नियोजन, नियमित अभ्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारावा. भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आत्तापासूनच करावी. स्पर्धा परीक्षांसाठी सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, वाचनाची सवय आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांना महत्त्व द्यावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले. नंदुरबार एज्युकेशन सोसायटी संचलित डी. आर. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात श्री गणेशाची महाआरती नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नरेंद्र सराफ, ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य पंकज पाठक, प्राचार्य संजय सैंदाणे, उपप्राचार्य दीपक सोनवणे आदी उपस्थित होते. जीवनात यश मिळविण्यासाठी शिस्त आणि मेहनत या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे पाटील यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकता, बंधुभाव, शिस्त, सामाजिक सलोखा आणि जबाबदार नागरिकत्व यांचा संदेश विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा, असेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोदकाचा प्रसाद वाटप करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com