फोटो : 30009
नाशिक : प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांच्याशी चर्चा करताना प्राथमिक शिक्षक संघाचे नंदलाल धांडे, सुनील बिरारी, जयेश सोनवणे, सोपान निकम, कपिल शिंदे.
५२ शाळेतील ४२६ शिक्षकांचे वेतन थांबले
खासगी प्राथमिक अंशत: शाळेतील ‘पोस्ट शिफ्टिंग’चा शिक्षकांना फटका
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१८ : अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील कार्यालयीन प्रक्रियेतील विलंबामुळे (पोस्ट शिफ्टिंग) मुळे ५२ शाळेतील तब्बल ४२६ शिक्षकांचे वेतन थांबल्याचा प्रकार उघडकीस आली आहे.
प्राथमिक शिक्षक संघाने यासंदर्भात शुक्रवारी (ता.१८) प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांची भेट घेत प्रश्न मांडला. शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागातील अधिकारी शिंदे यांना विचारणा केली असता कार्यालयीन अधीक्षक प्रदीप ढाके यांची पूर्णतः जबाबदारी असताना या बैठकीस अनुपस्थित होते. शिक्षणाधिकाऱ्यांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यास नोटीस बजावण्याचे आदेश दिले. शिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनसाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. त्यामुळे येत्या काळात हा प्रश्न सुटण्याची शक्यता वर्तविण्यात आली. चर्चेसाठी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नंदलाल धांडे, सचिव सुनील बिरारी, जयेश सोनवणे, सोपान निकम, कपिल शिंदे, विक्रांत नेरकर, सुनीता गायकवाड, नामदेव गुंडगळ आदी शिक्षक उपस्थित होते.