भुसावळ विभागातून आज
रेल्वे उशिराने धावणार
---
जळगाव स्थानकात यार्ड रिमॉडेलिंगच्या काम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : जळगाव रेल्वेस्थानकावर जळगाव–भुसावळ पाचव्या लाईनच्या अनुषंगाने यार्ड रिमॉडेलिंगचे प्री-नॉन इंटरलॉकिंग व नॉन इंटरलॉकिंग काम हाती घेण्यात येणार आहे. या कामाच्या अनुषंगाने काही गाड्या शनिवारी (ता. १९) उशिराने धावणार आहेत, तर
काही गाड्यांचे नियमन विभागात करण्यात येणार आहे.
१९०४६ थावे- सुरत एक्सप्रेस १ तास ४० मिनिटे उशिरा धावेल. १२३३५ भागलपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसचे एक तास ३५ मिनिटे नियमन करण्यात येणार आहे. २३ सप्टेंबरला १९००७ सुरत- भुसावळ एक्सप्रेस, १९१०५ उधना- भुसावळ एक्सप्रेस, १९१०६ भुसावळ- उधना एक्सप्रेस, ११११४ भुसावळ- देवळाली मेमू, ६११३० बडनेरा-नाशिक मेमू प्रस्थान स्थानकावरून रद्द राहतील.
२४ सप्टेंबरला १९००८ भुसावळ–सूरत एक्सप्रेस, ५९०७५ नंदुरबार- भुसावळ पॅसेंजर, ५९०७६ भुसावळ- नंदुरबार पॅसेंजर, ११११९ इगतपुरी- भुसावळ मेमू, १११२० भुसावळ- इगतपुरी मेमू, ११११३ देवळाली- भुसावळ मेमू, ६११२९ नाशिक -बडनेरा मेमू प्रस्थान स्थाकावरून रद्द राहतील, तर नियमन करण्यात येणाऱ्या गाड्या व कंसात वेळ अशी : १२७८० हजरत निजामुद्दीन- वास्को द गामा एक्सप्रेस (१ तास, ४० मिनिट), १२१०४ लखनऊ- पुणे एक्सप्रेस (१ तास, ३५ मिनिट), १५०१८ गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (१ तास, १५ मिनिटे), १९०४६ थावे- सुरत एक्सप्रेस (१ तास, ५ मिनिट), १५६४८ गुवाहाटी- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (१ तास, २५ मिनिट). प्रवाशांनी वरील परिचालन बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.