२८ जणांवर गुन्हा

२८ जणांवर गुन्हा
Published on
धुळे ः टुडे १ साठी -- गंगापूरला दोन गटांत हाणामारी - मागील भांडणावरून वाद; साक्रीत २८ जणांवर गुन्हा - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १८ ः गंगापूर (ता. साक्री) येथे मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटांत वाद होऊन हाणामारी झाली. दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात २८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. - वामन सखाराम गरदरे यांच्या फिर्यादीनुसार १५ सप्टेंबरला रात्री दोनच्या सुमारास घराबाहेरील अंगणात मागील भांडणाच्या कारणावरून उमेश सोनू गरदरे, विकास सोनू गरदरे, शंकर तानकू गरदरे, जयदीप नाना गरदरे, नाना काशीनाथ गरदरे, काळू खंडू गरदरे, सोनू काशीनाथ गरदरे, वसंत काशीनाथ गरदरे, विमल नाना गरदरे, युवराज भिला बाचकर, आकाश महारू बाचकर, सुनील चिंतामण कारंडे, अजित शंकर गरदरे व समाधान शंकर गरदरे यांनी काठ्या व हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचे नमूद आहे. शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसऱ्या फिर्यादीत जयदीप नाना गरदरे यांनी रात्री दीडच्या सुमारास गंगापूर येथील यात्रेच्या ठिकाणी सार्वजनिक जागेत खुशाल पंडित गरदरे, चेतन वामन गरदरे, विपुल वामन गरदरे, समाधान छगन गरदरे, वामन सखाराम गरदरे, पंडित सखाराम गरदरे, अशोक बोरकर, शेषराव अशोक बोरकर, जिजाबाई पंडित गरदरे, सारिकाबाई पंडित गरदरे, निर्मलाबाई वामन गरदरे, ज्योतीबाई पंडित गरदरे, दिलीप नारायण गरदरे व राहुल दिलीप गरदरे यांनी संगनमत करून नातेवाइकांना काठी व हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. शिवीगाळ व धमकी देण्याचाही आरोप करण्यात आला आहे. दोन्ही फिर्यादींवरून प्रत्येकी १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com