''सायब''सायबर सुरक्षा'' विषयावर परिसंवाद''सायबर सुरक्षा'' विषयावर परिसंवादर सुरक्षा'' विषयावर परिसंवाद

''सायब''सायबर सुरक्षा'' विषयावर परिसंवाद''सायबर सुरक्षा'' विषयावर परिसंवादर सुरक्षा'' विषयावर परिसंवाद
Published on
शहर टुडे पान दोनसाठी ------------------- शिरीष चौधरी महाविद्यालयात ''सायबर सुरक्षा''वर परिसंवाद सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १९ : येथील शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागातर्फे ''सायबर सुरक्षा'' या विषयावर विशेष परिसंवाद नुकतेच झाला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पराग नारखेडे उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून मुंबई उच्च न्यायालय, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे सिस्टीम ऑफिसर सूरज गजभिये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आधुनिक डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांचे वास्तव मांडताना त्यांनी ''डिजिटल अरेस्ट'', पार्सल घोटाळा, बनावट गुंतवणूक, नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक, शेअर मार्केट गैरव्यवहार व टेलिग्रामवरील अर्धवेळ नोकरीच्या आमिषाने होणाऱ्या फसवणुकीबाबत विविध उदाहरणांसह सविस्तर माहिती दिली. कोणतेही अनधिकृत थर्ड-पार्टी ॲप्स डाऊनलोड करू नये, व्हॉट्सॲपवर येणाऱ्या संशयास्पद फाईल्स उघडू नयेत, असा इशारा देत गजभिये यांनी सतर्कतेचा सल्ला दिला. फोन हॅक झाल्यास वैयक्तिक डेटा व कॅमेऱ्याचा गैरवापर कसा होऊ शकतो, हे स्पष्ट करत त्यांनी डिजिटल सुरक्षेचे नियम समजावले. संशयास्पद लिंक्स तपासण्यासाठी विशिष्ट टूल्सचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. ऑनलाइन फसवणूक झाल्यास त्वरित राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३०वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी नव्याने लागू झालेल्या डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्यावरही प्रकाश टाकला. प्रास्ताविक संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रियंका बऱ्हाटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अंकिता रानडे यांनी केले. प्रा. मृणालिनी सिंग यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com