जळगाव शहरातून तिघे बेपत्ता
आव्हाणे, सुप्रीम कॉलनी, जगवानी नगरातील घटना
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १९ : शहरातील जगवानीनगर, सुप्रीम कॉलनी आणि आव्हाणे अशा तीन वेगवेळ्या ठिकाणाहून तीन जण बेपत्ता झाले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी आणि तालुका पोलिसांत अपहरणाचे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
जगवानीनगर येथील रहिवासी आशाबाई संजय सोनार (वय ४५) या मंगळवारी (ता.१५) सकाळी अकराला घरातून निघून गेल्या. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही त्या मिळून आल्या नाहीत. अखेर त्यांचा मुलगा विकास सोनार याच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार भगवान चौधरी तपास करीत आहेत.
आव्हाण्यातून प्रौढ बेपत्ता
जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील नितीन अर्जुन जगदाळे (वय ४३) शुक्रवारी (ता.११) सायंकाळी राहत्या घरातून निघून गेले. त्यानंतर ते परत आलेच नाहीत. कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर मिळून न आल्याने जळगाव तालुका पोलिस ठाण्यात पत्नी मनीषा यांच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार सुनील पाटील तपास करीत आहेत.
चौकट
तरुणी बेपत्ता, गुन्हा दाखल
सुप्रीम कॉलनी येथील रहिवासी वासेफा मोहम्मद चौधरी (वय १८ मूळ रा. डबरा, ता. नवगड, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) ही तरुणी (ता.१४) सकाळी साडेनऊच्या सुमारास राहत्या घरातून अचानक गहाळ झाली. नातेवाइकांनी तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने तिला कायदेशीर रखवालीतून गुप्तपणे पळवून नेल्याचा संशय आहे. याप्रकरणी तरुणीचे वडील मोहम्मद अब्बास चौधरी (वय ४५) यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन तपास पोलिस नाईक भारती देशमुख करीत आहेत.