टुडे पान २ : मेन फिचर
NSK26H30056
जळगाव : दाधीची मंदिरात आरती करताना समाजबांधव.
---
NSK26H30057
महर्षी दधीची जयंतीनिमित्त निघालेली शोभायात्रा.
.........
शोभायात्रेच्या उत्साहात महर्षी दधीची जयंती
नवविवाहित सुनबाईंचे स्वागत; गुणवंत विद्यार्थी, मान्यवरांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १९ : दाधीच (दायमा) समाजाचे आद्यदैवत महर्षी दधीची ऋषी यांची जयंती शनिवारी (ता. १९) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. महर्षी दधीची चौकातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. यंदाच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते समाजात नव्याने दाखल झालेल्या नवविवाहित सुनबाईंच्या स्वागताचे.
महर्षी दधीची चौकातील स्तंभाला सतीश दायमा व पवन माळोदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सकाळी आठला शोभायात्रेला सुरुवात झाली. बँड पथक, सजविलेल्या वाहनावरील महर्षी दधीची ऋषींची प्रतिमा आणि त्यामागे सहभागी झालेल्या महिला-पुरुषांमुळे शोभायात्रेला भक्तिमय वातावरण लाभले. त्रिपाठी मार्ग, बालाजी मंदिर, रथ चौक, सराफ बाजार, भवानी मंदिर, सुभाष चौक, दानाबाजारमार्गे टॉवर चौकातून जिल्हा परिषदेच्या परिसरातील महर्षी दधीची मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. तेथे महाआरतीने सांगता झाली. आमदार सुरेश भोळे व बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष ओम त्रिवेदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. महाप्रसादानंतर महिला मंडळाच्या धार्मिक-सांस्कृतिक स्पर्धा, दधिमती मंगलपाठ आणि सायंकाळची आरती झाली. कार्यक्रमासाठी नवयुवक मंडळाचे अध्यक्ष शुभम त्रिपाठी, विनोद रतावा, सतीश दायमा, विनोद त्रिपाठी तसेच महिला मंडळाच्या अध्यक्षा भगवती दायमा व सचिव वंदना दायमा यांनी परिश्रम घेतले.
चौकट
गुणवंताचा सत्कार
रायसोनीनगर येथील महर्षी दधीची आश्रमात मुख्य कार्यक्रम झाला. प्रतिमापूजन व आरतीनंतर समाजातील दिवंगत व्यक्ती तसेच देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गौरी भाग्यश्री त्रिपाठी, सुरभी प्रथमेश दायमा व खुशबू अभिषेक शर्मा या नवविवाहितांचे स्वागत करण्यात आले. अर्पिता-वत्सल तिवारी आणि पूनम-पवन व्यास यांना कन्यारत्न पुरस्कार देण्यात आला. दहावी-बारावीतील गुणवंतांसह विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळविणाऱ्या यज्ञेश त्रिपाठी, नंदिनी पांडे, वैजयंती दायमा, यशस्विनी त्रिपाठी, आशुतोष दायमा व दिया दायमा यांचा सत्कार करण्यात आला.