बनावट कागदपत्रांचा वापर

बनावट कागदपत्रांचा वापर
Published on
धुळे : टुडे पान ३ साठी... -- बनावट गाव नमुना तयार करून फसवणूक -- निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल; बनावट कागदपत्रांचा वापर सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. १९ : उभंड (व.) (ता. साक्री) गावातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बनावट गाव नमुना क्रमांक ८ तयार केल्याप्रकरणी भटू शालिकराम पाटील यांच्या विरोधात बुधवारी (दि. १६) निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामपंचायत अधिकारी रोहन सैंदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, उंभंड (व.) येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शासकीय जमिनीवर भटू पाटील यांनी अतिक्रमण केल्याचे उघडकीस आले आहे. शासकीय जमिनीवरील मालकी हक्क दाखवण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित जागेचा बनावट गाव नमुना क्रमांक ८ तयार करण्यात आला असून, त्यावर बनावट सही व शिक्का वापरण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शासकीय जमिनीवर अतिक्रमण आणि महसूल विभागाच्या कागदपत्रांचा बोगस वापर केल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. पोलिसांनी भटू पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे. हा बनावट उतारा तयार करण्यासाठी त्यांना अन्य कोणाचे सहकार्य किंवा मदत लाभली होती का, तसेच या शासकीय जमिनीवर कोणते आर्थिक व्यवहार किंवा बेकायदेशीर हक्क निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी संबंधितास ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान संशयितास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com