धुळे : टुडे पान २ साठी...
--
फोटो क्रमांक : 30048
धुळे : पिंपळादेवी विद्यालयात विद्यार्थ्याना ऊर्जा बचतीची शपथ देताना महावितरणचे अभियंता. शेजारी मान्यवर, शिक्षक आदी.
--
विद्यार्थ्यांनी घेतली ऊर्जा बचतीची शपथ
--
पिंपळादेवी विद्यालयात विद्युत सुरक्षेचा पाठ
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १९ : गणेशोत्सव व राष्ट्रीय अभियंता दिनाचे औचित्य साधून महावितरणच्या वतीने मोहाडी उपनगरातील श्री पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘विद्युत सुरक्षा, हरित ऊर्जा व ऊर्जा बचत’ या विषयावर विशेष जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
महावितरणचे सहाय्यक अभियंता भूषण मांडवाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्युत उपकरणांचा सुरक्षित वापर, अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, वीज बचतीचे महत्त्व, विजेचा अपव्यय टाळण्याचे उपाय आणि हरित ऊर्जेची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. प्राचार्य एस. एस. पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता महेंद्र चव्हाण व संध्या घोडके उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा साक्षरता निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुरक्षित वीज वापर आणि ऊर्जा बचतीची शपथ देण्यात आली. भविष्यातील पिढीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पर्यवेक्षक ए. आर. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एस. व्ही. पाटील यांनी आभार मानले.